राम मंदिराच्या आराखड्याला मंजुरी मिळण्याची शक्यता; अयोध्या विकास प्राधिकरणाची बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला आज मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या आराखड्याबाबत अयोध्या विकास प्राधिकरणाची बैठक होत आहे. त्यात या आराखड्याला मंजुरी देण्यात येण्याची शक्यता आहे. बोर्डाचे अध्यक्ष कमिश्नर एम.पी. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे.

श्रीरामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने 274110 वर्गमीटर क्षेत्राचा आराखडा तयार केला आहे. ट्रस्टला विकास शुल्कासह अनुरक्षण शुल्क आणि लेबर सेसही द्यावा लागणार आहे. सुमार पाच कोटींच्या आसपास हे सर्व शुल्क येण्याचा अंदाज आहे. आयकरातील सवलतीनंतर हे शुल्क भरावे लागणार आहे. आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्राधिकरण शुल्क जमा करण्यासाठी ट्रस्टला पत्र पाठवणार आहे. त्यानंतर ट्रस्ट शुल्क जमा करेल आणि प्राधिकरणाकडून ट्रस्टला मंजूर झालेला आराखडा देण्यात येणार आहे.