शाहीद अमृताच्या ‘इश्क विश्क’चा येणार सिक्वेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शाहीद कपूर व अमृता राव यांचा सुपरहिट चित्रपट ‘इश्क विश्क’ या चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार आहे. चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांनी याविषयी घोषणा केली आहे. अद्याप या चित्रपटात शाहिद व अमृता असणार का हे निश्चित झालेले नाही.

‘लवकरच आम्ही इश्क विश्कचा सिक्वेल बनवणार आहोत. या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरू आहे. या चित्रपटात देखील किशोरवयीन मुलांची प्रेमकथा दाखविण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यात स्क्रिप्ट फायनल झाल्यावर फिल्मचे दिग्दर्शक व कास्ट ठरविण्यात येणार आहे’, असे रमेश तौरानी यांनी सांगितले.

इश्क विश्क या चित्रपटाचे दिग्दर्शन केन घोष यांनी केले होते. या चित्रपटात शाहिद कपूर, अमृता राव मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट तरुणांमध्ये प्रचंड गाजला होता.