
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठणप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोषमुक्त करण्याची विनंती करीत सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. ज्येष्ठ वकील रिझवान मर्चंट आणि ऍड. शब्बीर शोरा यांनी राणा दाम्पत्याच्या दोषमुक्ततेसाठी मंगळवारी अर्ज केला. न्यायालयाने त्यांच्या अर्जावर सरकारी पक्षाचे उत्तर मागवले आहे. पुढील सुनावणी 2 फेब्रुवारीला होणार आहे.






























































