आदित्य तरे, सिद्धेश लाडची अर्धशतके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

महाराष्ट्राच्या फलंदाजांना दुसऱ्या दिवशी निराशेला सामना करावा लागल्यामुळे त्यांना पहिल्या डावात 352 धावाच करता आल्या. गोलंदाजांनी सकाळच्या सत्रात प्रभावी कामगिरी केल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांना त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. अनुभवी खेळाडू आदित्य तरे आणि सातत्याने संकटसमयी धावून येणारा सिद्धेश लाड यांनी अनुक्रमे 63 व नाबाद 70 धावा करीत महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा नेटाने मुकाबला केला. दुसऱ्या दिवसअखेरीस 5 बाद 196 धावा करणारा मुंबईचा संघ रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट गटाच्या लढतीत 156 धावांनी पिछाडीवर आहे. महाराष्ट्राने 3 बाद 298 या धावसंख्येवरून शुक्रवारी पुढे खेळायला सुरुवात केली. पण आकाश पारकरने जय पांडेला 74 धावांवर त्रिफळाचीत केले. तसेच कर्णधार राहुल त्रिपाठी 40 धावांवर धावचीत झाला. यानंतर महाराष्ट्राच्या डावाला खिंडार पडले. महाराष्ट्राचा संघ 3 बाद 310 या धावसंख्येवरून 352 धावांवरच गारद झाला. आकाश पारकरने 56 धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.