रणबीर-श्रद्धा म्हणताहेत, तू झूठी मैं मक्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी ‘तू झूठी मैं मक्कार’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शीर्षकाची झलक नुकतीच पाहायला मिळाली. टायटल व्हिडीओमध्ये श्रद्धा आणि रणबीरने साकारलेल्या ‘झूठी’ आणि ‘मक्कार’ या पात्रांची झलक पाहायला मिळते. लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. टी-सीरिज प्रस्तुत हा चित्रपट 8 मार्च रोजी होळीच्या दिवशी  चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.