
सामना ऑनलाईन । मुंबई
तिकडे इटलीमध्ये अखेर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा ‘बॅण्ड बाजा बारात’ रीलिज झाला. कोंकणी आणि सिंधी या दोन्ही पद्धतीने त्यांचे शुभमंगल झाले आणि अक्षता पडल्या. गुरुवारी या लग्नाची छायाचित्रे प्रसारमाध्यमांकडे देण्यात आली. इन्स्टा अकाऊंटवर एका मिनिटात सुमारे 12 हजार जणांनी या छायाचित्रांना लाइक केले. कोंकणी पद्धतीत दीपिकाने सोनेरी कांजीवरम तर सिंधी पद्धतीच्या लग्नात गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.




























































