गरज पडल्यास राममंदिरसाठी कायदा करायला सरकार मागेपुढे पाहणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येत राम मंदिर प्रश्नी कायदा करा, नाहीतर लोक रस्त्यावर येतील, असे वक्तव्य केले होते. याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे लोकभावनेचा आदर करत गरज पडल्यास कायदा करायला सरकार मागेपुढे पाहणार नाही, असे म्हटले आहे.

नगर येथील भाजप प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार दानवे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगितले. ‘राममंदिर उभारण्यात यावे, अशी देशातील समस्त हिंदू बांधवांची इच्छा आहे. तिच भावना सरसंघचालक भागवत यांनी व्यक्त केली. या मताशी मी सहमत आहे. राममंदिर उभारणीतील अडचणींवर सरकार लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात कायदा करण्याची गरज असेल तर सरकार कायदा करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही.’