अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीने दिला बाळाला जन्म, नवजात अर्भकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये एका 13 वर्षीय बलात्कार पीडितेने बाळाला जन्म दिला. नंतर थोड्याच वेळात अर्भकाचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशमध्ये एका 13 वर्षीय मुलीवर गेल्या वर्षी 29 वर्षीय अमरनाथ तिवारी याने बलात्कार केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. नंतर अमरथान तिवारीने या मुलीवर वारंवार बलात्कार केला.

फेब्रुवारी महिन्यात आपली मुलगी गरोदर असल्याचे कुटुंबीयांना कळाले. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपी अमरनाथ तिवारीला तत्काळ अटक केली.

गुरूवारी पीडित मुलीने मुलीला जन्म दिला. पण अर्भकाचा काही वेळातच मृत्यू झाला. अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.