प्रशांत किशोर पाटण्याबाहेरील आश्रमात मुक्कामाला; 2030 च्या बिहार विधानसभा निवडणुकीपर्यंत तिथेच राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जन सुराज्य पक्षा’चे संस्थापक प्रशांत किशोर यांनी पाटण्याच्या वेशीवर असलेल्या एका आश्रमात आपला मुक्काम हलवला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला यश मिळेपर्यंत आणि पक्ष पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत ते याच आश्रमातून आपल्या पक्षाचे कामकाज चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बिहारमध्ये 2030 ला निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची रणनीती आखणे आणि ‘जन सुराज्य पक्षा’ला बिहारच्या राजकारणात मजबूत स्थान मिळवून देण्यासाठी प्रशांत किशोर या आश्रमात राहणार असल्याचे समजतते. “निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळत नाही आणि पक्ष पूर्णपणे स्थिरावत नाही, तोपर्यंत मी याच आश्रमात राहून माझी राजकीय कामे सुरू ठेवणार आहे.” असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.