
कोकणच्या हापूसने यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वीच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये जोरदार एण्ट्री केली आहे. गेल्या आठवडय़ापासून हापूसच्या पेटय़ा मार्केटमध्ये येण्यास सुरुवात झाली असून आता दिवसाची आवक पावणेपाचशे पेटय़ांपर्यंत गेली आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रथमच मार्केटमध्ये आंब्याची इतकी विक्रमी आवक होत आहे. पेटीला सुमारे चार ते आठ हजार रुपयांचा दर मिळत आहे.






























































