
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
रत्नागिरीत आज सकाळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी काही परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे आंबा बागायतदारांना धक्का बसला आहे.
रत्नागिरी शहर आणि तालुका परिसरात सकाळी आठ वाजता अवकाळी पावसाच्या सरी सुरू झाल्या. या अवकाळी पावसाने अनेकांना भिजवले. बागायतदारांचे सध्या आंबा मोहराकडे लक्ष आहे. मात्र अवकाळी पावसाचा फटका आंब्याला बसण्याची शक्यता निर्माण झाली. दिवाळीपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.





























































