
न्यू एरा प्रॉडक्शन आणि मराठी रंगभूमी, रत्नागिरी यांनी तयार केलेली ‘नवी सुरुवात’ ही शॉर्ट फिल्म नुकतीच यू टय़ूबवर प्रदर्शित झाली आहे. कोरोनाच्या काळात नात्यांमधील आपुलकीचा संदेश देणाऱया या शॉर्ट फिल्मला यू टय़ूबवर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीतील स्थानिक कलाकारांनी एकत्र येत या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे.
‘नवी सुरुवात’ या शॉर्ट फिल्मचे लेखन स्वानंद मयेकर आणि प्रशांत पवार यांनी केले असून दिग्दर्शनाची जबाबदारी ओंकार पाटील यांनी सांभाळली आहे. कोरोनाचे दुःख विसरून आता हळूहळू सगळे आपापल्या कामाला लागत आहेत. मात्र या लॉकडाऊनच्या काळात तयार झालेली आपुलकीची भावना यापुढेही तशीच जोपासण्याचा संदेश या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
सात मिनिटांच्या या शॉर्ट फिल्मचे कला दिग्दर्शन प्रवीण धुमक, छायांकन प्रसाद राणे यांनी तर पार्श्वसंगीत निखिल भुते यांनी केले आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध कलाकार अजित पाटील यांच्यासोबत सागर मायंगडे, स्वानंद मयेकर, सिद्धी लांजेकर, स्मितल चव्हाण त्याचबरोबर आयुष शिरसा आणि आर्या धुमक या बालकलाकारांनी अभिनय केला आहे.
‘अल्पह्न्सो प्रॉडक्शन’ या यू टय़ूब चॅनेलवर नुकतीच ही शॉर्ट फिल्म प्रसिद्ध करण्यात आली असून ही शॉर्ट फिल्म रत्नागिरीतील बसणी गावात चित्रीत झाली आहे. विजय गुरव, संतोष गार्डी आणि दुर्वेश सागवेकर यांचे मोलाचे सहकार्यही या शॉर्ट फिल्मसाठी लाभले आहे.





























































