
रत्नागिरी शहरातील रामआळी येथी कपड्याचे दुकान फोडणाऱ्या राजस्थानमधील तिघांच्या टोळीतील एकाच्या मुसक्या आवळण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांना यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या एकाला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हा प्रकार 15 मे रोजी उघडकीस होता आणि त्यानंतर फिर्यादीने शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती.
रामआळी येथे कमलेश गुंदेजा यांचे कॉर्नर स्टाईल हे कपड्याचे दुकान आहे. या दुकानात अज्ञात चोरट्यांनी टेरेसवरुन येवऊन लोखंडी ग्रील उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील 24 हजारांची रोख रक्कम, 1 लाख 23 हजार 938 रुपयांचे 60 शर्टस, 56 हजार 470 रुपयांच्या 30 जीन्स, 48 हजार 975 रुपयांच्या ट्राउझर, 40 हजार 776 रुपयांचे टी शर्ट, 20 हजार रुपयांच्या ब्लेझर जॅकेट, 42 हजार रुपयांच्या सिल्वर कॉईन, 840 रुपयांची चांदीची दोन नाणी असा एकूण 3 लाख 19 हजार 699 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. कमलेश गुंदेचा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातांविरोधात शहर पोलिसांनी भादवि कलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला होता.
या चोरीच्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी स्वत:कडे घेतला होता. शहर पोलिसांच्या डिबी स्कॉडच्या सहकार्याने त्यांनी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टोळीचा शोध सुरु केला होता. त्यानंतर राजस्थान येथे अशा चोऱ्या करणारी टोळी असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. त्यानंतर डिबीची एक टिम राजस्थान येथे गेली होती. यावेळी टोळीतील एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.उर्वरित दोघे लवकरच पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाने चोरीची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

























































