
कोरोनावरील लस संपल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना लसीकरण ठप्प झाले होते. कोल्हापूरहून सोमवारी 19,200 कोवीशिल्ड लस रत्नागिरी जिल्ह्याला उपलब्ध झाली. त्यामुळे मंगळवारपासून पुन्हा जिल्ह्यातील 107 केंद्रांवर लसीकरण मोहिम सुरु होणार आहे. जिल्ह्यात कोवीडवरील लस संपल्यानंतर शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तातडीने आढावा बैठक घेऊन लसींची मागणी केली होती.
जानेवारी महिन्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनावरील लसीकरण सुरु झाले. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील 107 केंद्रांवर ही लसीकरण मोहिम सुरु होती. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे गुरुवारपासून जिल्ह्यात लसीकरण मोहिम ठप्प झाली होती. आज रत्नागिरी जिल्ह्याला 19,200 लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मंगळवारपासून ही लसीकरण मोहिम सुरु होणार आहे.

























































