
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
2014-15च्या हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे राज्य शासनाने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत़. त्यामुळे आज पावस परिसर रत्नागिरी हापूस बागायतदार सहकारी संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडण्यात आले़. शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण कंरावीत अशी मागणी यावेळी आंबा बागायतदारांनी केली़.
2014-15 मध्ये अवकाळी पाऊस पडला होता़. त्यावेळी आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले़. आंबा बागायतदारांनी आंदोलने केल्यानंतर राज्य सरकारने आंबापिक कर्जावरील 3 महिन्यांच्या व्याजाची रक्कम शासन देईल असे जाहीर केले़. तसेच कर्जाच्या रकमेचे पुनर्गठन करण्याचा निर्णय झाला़. त्या कर्जावरील पहिल्या वर्षाचे व्याज शासन भरणार असून पुढील रकमेवरील 6 टक्के व्याज शासन भरेल असा अध्यादेश शासनाने काढला होता़. मात्र त्यावरील व्याजाच्या रकमेचा एकही हप्ता शासनाने बँकांमध्ये भरलेला नाही़. त्यामुळे बँका आता आंबा बागायतदारांना तात्काळ कर्जाच्या व्याजाची रक्कंम तातडीने भरण्याची सक्ती कंरत आहेत. असा आरोप आंबा बागायतदारांनी केला आहे़.
त्यामुळे शेतकंर् यांना या व्याजमाफीचा तात्काळ फायदा शासनाने करून द्यावा़ तसेच पिकांवरील कर्जाचे व्याजदर कमी कंरावेत अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली़, यावेळी संघटनेचे अध्यक्ष साळवी, जि़ प़ सदस्या, आरती तोडणकंर, विसेनेचे विभागप्रमुख रवीकिंरण तोडणकंर, उपाध्यक्ष नाखवा, सचिव सुरेंद्र भडेकंर यांच्यासह आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते़. पावस येथील स्थानिकं जि़प़सदस्या आरती तोडणकंर यांनीही या आंदोलनाला पाठींबा देत धरणे आंदोलनात सहभाग घेतला़.
































































