
महावितरणच्या स्मार्ट मीटर संदर्भात वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी शहर आणि तालुका कार्यकारिणीच्या बैठकीला येताना पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्या तक्रारी घेऊन येणे अशा सूचना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी दिल्या आहेत.