‘बुटाच्या लेस बांधता येत नाहीत तेही धोनीच्या निवृत्तीची वाट बघताहेत’

470

हिंदुस्थानच्या सीनियर निवड समितीने बांगलादेशविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली. याप्रसंगी रिषभ पंत, संजू सॅमसनला यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आले. महेंद्रसिंग धोनी केव्हा निवृत्त होतोय असा सूरही यावेळी उमटू लागला. यावेळी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यावेळी टीकाकारांना आपल्या शैलीत उत्तर दिले. इंग्रजी दैनिकात दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, महेंद्रसिंग धोनीने देशासाठी 15 वर्षे क्रिकेट खेळले आहे. केव्हा निवृत्त व्हायला हवे हे त्याचा चांगलेच ठाऊक आहे. त्याच्या निवृत्तीची घाई कशाला हवी, असा सवालही पुढे त्यांनी केला आहे. ज्या व्यक्तींना बुटाच्या लेसही बांधता येत नाहीत तेही महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची वाट बघत आहेत.

धोनीने कसोटीला अलविदा केला तेव्हा तो म्हणाला, रिद्धिमान साहा आता यष्टिरक्षणासाठी तयार झाला आहे. त्यामुळे मी निवृत्त झालो तरी चालेल. आजही त्याच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंना खेळाचे कसब आत्मसात करता येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या