आरोग्य – आहाराद्वारे कॉलेस्ट्रॉल कमी करा

नेहा चौधरी, आहार तज्ञ, एसआरव्ही हॉस्पिटल, डोंबिवली

एखाद्या व्यक्तीचा आहार हा त्याच्या कॉलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम करू शकतो. संतुलित आहारच कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. चुकीच्या आहाराच्या सवयी मात्र ती पातळी वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. योग्य आहाराच्या सवयीने पातळी निरोगी राखल्यास हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यांसारख्या आरोग्यविषयक समस्या टाळता येतात.

कॉलेस्ट्रॉलच्या प्रकारांमध्ये ‘एलडीएल’ कॉलेस्ट्रॉलला सामान्यतः ‘खराब’ कॉलेस्ट्रॉल असे संबोधले जाते. कारण या कॉलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होतात. हे फॅट्स रक्तप्रवाहात अडथळा आणू शकतात. परिणामी, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यांसारख्या जीवघेण्या परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते. ‘एचडीएल’ म्हणजेच ‘चांगले’ कॉलेस्ट्रॉल हे यकृताद्वारे शरीरातून बॅड कॉलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते. उच्च ‘एचडीएल’ कॉलेस्ट्रॉल पातळी हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी करू शकते.

कॉलेस्ट्रॉल म्हणजे नेमके काय?

कॉलेस्ट्रॉल हा तुमच्या रक्तामध्ये आढळणारे चरबीयुक्त पदार्थ असतो. जो नैसर्गिकरीत्या तुमच्या यकृताद्वारे तयार केला जातो. कॉलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात विविध प्रकारे कार्ये करते, परंतु तुमच्या रक्तात त्याची पातळी जास्त असणे धोकादायक ठरू शकते.

रक्तातील अतिरिक्त कॉलेस्ट्रॉलची पातळी ही चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे उद्भवू शकते. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी निरोगी खाण्याच्या सवयींचे पालन करणे योग्य राहील.

एक कप ओट्स वजन कमी करण्यास मदत करेल का? मूठभर बदाम का वापरून पाहत नाही? काही आहारातील सोपे बदल, व्यायाम आणि इतर हृदयनिरोगी पद्धती तुमचे कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात.

रोजच्या आहाराद्वारे कॉलेस्ट्रॉलची पातळी कशी कमी करता येईल?

फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

स्निग्ध पदार्थांतली चरबीचा (सॅच्युरेटेड फॅट्स) चरबीचा तुमच्या आहारातील वापर कमी करा.

ट्रान्सफॅट्सचे सेवन करू नका.

सोल्युबल फायबरचे सेवन वाढवा – हा एक प्रकारचा पाण्यात विरघळणारा फायबर आहे. विरघळणारे फायबर (ज्यामध्ये  कॉलेस्ट्रॉल असते) ते तुमच्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात.

वापर कमी करा – सॅच्युरेटेड फॅट ही चरबीयुक्त पदार्थांचा (सॅच्युरेटेड फॅट्स) एक प्रकारची घन चरबी असते. ही सामान्यतः मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळून येते.

ट्रान्सफॅट्चे सेवन करू नये – फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. त्यामध्ये भरपूर चरबी असू शकते.

वैविध्यपूर्ण पदार्थांचा आहारात समावेश करा – योग्य पोषक आहाराद्वारे निरोगी कॉलेस्ट्रॉलची पातळी राखताना विविध प्रकारची फळे, भाज्या, धान्य, प्रथिने, कमी चरबीयुक्त डेअरी/दुग्धजन्य पदार्थ आणि फॅट्स यांचा समावेश असलेला आहार घेणे गरजेचे आहे.

लक्षात ठेवा कॉलेस्ट्रॉलचे अनेक प्रकार आहेत. ‘एचडीएल’ (‘चांगले’) कॉलेस्ट्रॉल तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी ‘एलडीएल’ (‘खराब’)  कॉलेस्ट्रॉलची उच्च पातळी हृदयरोग, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या जोखमीशी संबंधित आहे. हे कॉलेस्ट्रॉल तुमच्या धमन्यांच्या भिंतींना चिकटून राहणारे आणि रक्तवाहिन्यांना अडथळा आणणारे प्लेक्स तयार करण्यास कारणीभूत ठरतात.