
रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या घरातून काल अनेक वस्तू हस्तगत केल्या आहेत. यातील आयपॅड तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहे. तर, या घटनेसाठी पैशाचा व्यवहार कशा पद्धतीने झाला, याचासुद्धा तपास पूर्णत्वाकडे गेलेला आहे. फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणाऱया तिन्ही वस्तूंचा उलगडा झाल्यानंतर अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार आहेत.
आरोपी बोठे याला तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश काल न्यायालयाने दिले होते. या घटनेनंतर आता पोलिसांनी त्याच्याकडून आयपॅडसह अन्य काही वस्तू हस्तगत केल्या आहेत. बोठे याच्याकडील मोबाईल फोनही उद्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले जाणार आहेत. नगर येथे लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, लॉक न उघडल्याने या वस्तू फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हत्येसाठी दिलेल्या पैशांच्या व्यवहाराचा तपास सुरू
n जरे हत्याकांड प्रकरणांमध्ये अजून कोणाचा समावेश आहे, याचीसुद्धा माहिती घेतली जात आहे. पैशांचे व्यवहार कोणी, कसे व कोणामार्फत केले, याचा तपास सुरू झाला आहे. त्यामुळे बोठे याच्या बँक खाते तसेच त्याने याअगोदर दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे पैशाचे व्यवहार कशा पद्धतीने झाले, याचाही उलगडा आता लवकरच होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत 40 हून अधिक जणांचे जबाब घेतल्यामुळे पोलिसांच्या हाती अनेक माहिती आली आहे.































































