
हिंदुस्थानात कोविड महासाथीच्या अनपेक्षित अशा नव्या लाटेने रौद्र रुप घेतले असतानाच रिलायन्स इंडस्ट्रिजने देशवासीयांचे मौल्यवान जीव वाचविण्यासाठी अधिक सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
सद्य काळाची आव्हानात्मक गरज ही देशभरातील गंभीर आजारी रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय द्रवरुप प्राणवायूचा निर्विवाद उपलब्धता आहे. खरे तर रिलायन्स वैद्यकीय द्रवरुप प्राणवायू तयार करत नाही. उलट, वैश्विक महासाथीपूर्वी या क्षेत्रात काहीही अस्तित्व नसताना, रिलायन्स इंडस्ट्रिज आता एकाच ठिकाणाहून हे जीवनसंरक्षक संसाधन तयार करणारा हिंदुस्थानातील सर्वात मोठा उपादक समूह बनला आहे.
कंपनीची जामनगर आणि इतरत्रची इंधन शुद्धीकरण-पेट्रोकेमिकल संकुले आता दिवसाला 1000 मेट्रिक टन वैद्यकीय द्रवरुप प्राणवायू तयार करत आहेत. हे प्रमाण देशातील एकूण प्राणवायू उत्पादनाच्या तुलनेत 11 टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच 10 पैकी जवळपास एका रुग्णाची गरजपूर्तता यातून होत आहे.




























































