
महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्यदक्ष म्हणून सेवा बजावून 2017 साली सेवानिवृत्त झालेले वीरेंद्र शिंदे यांचे वयाच्या त्रेसष्ठाव्या वर्षी निधन झाले. सुरुवातीला कोरोनाची लक्षणे आढळल्याने शिंदे यांच्यावर त्या पद्धतीने उपचार सुरू करण्यात आले. त्यातून ते ठीकही झाले. पण नंतर दुसऱया आजाराने त्यांना गाठले आणि त्यातच मृत्यू झाला. मात्र त्यांच्यावरील उपचाराच्या बिलाने त्यांचे कुटुंबीय जेरीस आले आहे.
वीरेंद्र शिंदे यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काही दिवसांनी ते कोरोनातून बरे झाले, परंतु ते अन्य आजारात सापडले. त्यांचे वैद्यकीय बिल सुमारे सोळा लाखांवर गेले. घरातील दागिने विकून आणि मेडिकल इन्शुरन्सच्या माध्यमातून सुमारे आठ लाख रुपये अदा करण्यात आले. त्यांना रुग्णवाहिकेतून अन्य इस्पितळात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. शिंदे यांच्या मुलीचा विवाह पुढच्या महिन्यात ठरला असून मुलाच्या विवाहाची बोलणी सुरू आहे. अशाच वेळेला विरेंद्र शिंदे यांच्यावर काळाने झडप घातली यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






























































