रेवतळे-आडारी येथील प्रकार : गाळ उपासाच्या नावाखाली नदीप्रवाह अडवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मालवण

मालवण रेवतळे-आडारी नदीत पुलाच्या बाजूला बंधारा घालून पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात पाणी साठून लोकवस्ती मध्ये नदीचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान हा बंधारा कोणी व कशासाठी उभारला याची संबंधित विभागाने चौकशी करून मातीचा बंधारा पावसाळ्या पूर्वी हटवावा. तसेच नदीतील गाळ उपसा करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सर्व माहिती देऊनच गाळ उपसा करावा अन्यथा या कामासाठी ग्रामस्थाचा तीव्र विरोध राहील. अशी आक्रमक भूमिका आडारी ग्रामस्थानी घेतली आहे.

मालवण शहराला जोडणारा आडारी रेवतळे मार्गावरील पुलाजवळ नदीच्या पत्रातील गाळ उपसा करण्यासाठी गेल्या महिन्याभरापूर्वी मातीचा बंधारा बांधून पाण्याचा प्रवाह अडविण्यात आला. असे बोलले जात आहे नदी पत्रातील गाळ काढण्यात येणार होता. मात्र मातीचा बंधारा घालून पाण्याचा प्रवाह बदलून अनेक दिवस झाले तरी अद्याप नदीतील गाळ उपसा करण्यात आला नाही. मग याठिकाणी मातीचा बंधारा बांधून पाण्याचा प्रवाह का रोखण्यात आला. असा सवाल स्थानिक ग्रामस्थामधून विचारला जात आहे. आता पावसाळा जवळ आला असून पाण्याचा प्रवाह सुरळीत करणार कधी असा सवाल स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

येथील स्थानिक ग्रामस्थाच्या लोकवस्तीत पावसाळ्यात नदीचे पाणी भरून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्या पूर्वी या नदी पात्रातील गाळ उपसा करण्यात यावा, गाळ उपसा करताना स्थानिक ग्रामस्थांना माहिती देण्यात यावी अनाथ नदी पत्रातील गाळ उपसा करण्यास ग्रामस्थाचा विरोध असणार आहे. नदीवरील पुलाच्या प्रवाहाच्या ठिकाणी घातलेला मातीचा बंधारा पावसाळ्या पूर्वी हटविण्यात यावा याबाबत संबंधित विभागाने लक्ष देऊन लवकरात लवकर समस्याचे निवारण करावे अशी मागणी आडारी ग्रामस्थांनी केली आहे.