ऋषिकेश जोशी म्हणतोय ‘येतोय तो खातोय’

ऋषिकेश जोशी दिग्दर्शित ‘येतोय तो खातोय’ या नव्या नाटकाचा प्रयोग 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. विजय कुवळेकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. पॉलिटिकल सटायर हा नाटकाचा फॉर्म आहे. सुयोग नाटय़ संस्थेची ही 90 वी कलाकृती आहे.
‘येतोय तो खातोय’मध्ये ऋषिकेश जोशी, संतोष पवार, स्वप्नील राजशेखर, भार्गवी चिरमुले, अधोक्षज कऱहाडे, मयुरा रानडे, सलीम मुल्ला, ऋषिकेश वांबूरकर आदी कलाकारांनी काम केले आहे. नाटकात सहा गाणी आहेत.