तिकीटासाठी कायपण, मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेने रचला स्वत:वर गोळीबाराच बनाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

16 नोव्हेंबर 2021ला उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रिता यादव नावाच्या महिलेने मोदींना काळा झेंडा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे त्या अचानक प्रकाशझोतात आल्या होत्या. पूर्वी समाजवादी पक्षात असलेल्या रिता यादव यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भेट घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या रिता यादव यांच्यावर 3 जानेवारी 2022 रोजी गोळीबार झाला होता. काँग्रेसने या मुद्दावरून भाजपवर भरपूर टीका केली होती. आता या प्रकरणात नव्या घडामोडी घडल्या असून आपल्यावर गोळीबार झाला आहे अशी तक्रार करणाऱ्या रिता यांनाच पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की रिता यादव यांनी काँग्रेसकडून आपल्याला विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळावं यासाठी रिता यादव यांनी हे नाटक रचलं होतं. रिता यादव यांनी तक्रार दाखल केली होती तेव्हापासूनच गोळीबाराचं हे प्रकरण पोलिसांना संशयास्पद वाटत होते. रिता यादव यांना पोटरीवर छर्रे लागले होते, शरिराच्या इतर कोणत्याही भागावर गोळीबाराच्या जखमा नव्हत्या. रिता यादव यांनी त्यांचा गाडीचालक मुस्तकीम आणि माजी सरपंच माधव यादव यांच्यामदतीने स्वत:वर गोळीबार करवला होता. पोलीस तपासात ही बाब उघडकीस आली असून पोलिसांनी रिता यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांनाही अटक केली आहे.ो