Lok Sabha 2019 लालूंना धक्का, राजदचे संस्थापक नेते गिरीनाथ सिंह भाजपमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ नेते गिरीनाथ सिंह यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राजदला मोठा धक्का बसला असून भाजपचे पारडे जड झाले आहे. गिरीनाथ सिंह हे गेल्या 30 वर्षांपासून राजदमध्ये होते. गिरीनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांना चतरा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी गिरीनाथ सिंह हे भाजपच्या संपर्कात होते त्यामुळे त्यांना पक्षातून सहा महिन्यांसाठी निलंबीत करण्यात आले होते. त्यानंतर गिरीनाथ सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राजच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबत आणखी चार राजद नेत्यांनी देखील राजीनामा दिली होता.