मथुरेत गाडी कालव्यात कोसळली; अपघातात चौघांचा मृत्यू , चौघे जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मथुरेतील शेरगड भागात पुलाच्या कठड्याला धडकून एक गाडी कालव्यात कोसळली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना कोसीमधील एका खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. त्या चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

ईको गाडीतून आठजण प्रवास करत होते. गाडी पूलावर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी पूलाच्या कठड्याला धडकत कालव्यात कोसळली. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर चारजण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

किशोरी लाल, किशोरी पाल, मोहन श्याम, राजेंद्र यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर अशोक सोनु,सोनु आणि हेमंत जखमी असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. कोसीमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांच्या कटुंबीयांना घटनेबाबत कळवण्यात आले असून अपघाताबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.