
सामना प्रतिनिधी । लातूर
शहरातील बाभळगाव रोडवरील एक घर अज्ञात चोरट्यांनी फोडले आणि सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 98 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास केला. या चोरी प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात नरसींग भानुदास पुरी ( रा. बाभळगाव रोड, वसंत विहार.) यांनी तक्रार दाखल केली असून तक्रारदाराचे बंद घर पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 98 हजार 600 रुपयांचा ऐवज पळवला. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक डी.जे. पाटील हे करीत आहेत.






























































