फेडरर खेळणार इटालियन स्पर्धेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रोम

रॉजर फेडरर तब्बल चार वर्षांनंतर फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत खेळणार आहे. मात्र मातीतल्या टेनिस कोर्टवर उतरण्याआधी स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू इटालियन ओपन स्पर्धेत सहभागी होणार आहे. सर्वाधिक 20 वेळा ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱया रॉजर फेडररला माद्रिद ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत डॉमिनिक थिमकडून हार सहन करावी लागली. त्यानंतर रॉजर फेडररने शनिवारी आपण इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत खेळणार असल्याचे सांगितले.