सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे – रोहित पवार

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.

आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले आहेत की, “मनुवादी वकील राकेश किशोर याला सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवरील हल्ल्याचा किंचितही पश्चाताप नाही. अद्यापही त्याची भाषा मग्रुरीचीच असून याचा अर्थ मनुवादी विचारांनी त्याचा मेंदू सडल्याचं दिसतंय. लोकशाहीत राहून लोकशाहीवर उलटणाऱ्या आणि संविधानाला आव्हान देणाऱ्या अशा विकृतावर तत्काळ देशद्रोहाचा कठोर गुन्हा दाखल झाला पाहिजे.”

ते म्हणाले की, “राकेश किशोर हा संघाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असल्याने संघाचीही बदनामी होत आहे, त्यामुळं संघानेही यावर तत्काळ यावर खुलासा करावा.”