
सामना ऑनलाईन । फिरोजाबाद
उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची त्याच्या घराबाहेर अज्ञात इसमांनी गोळ्या घालून हत्या केली. संदीप शर्मा असे त्या कार्यकर्त्याचे नाव असून तो संघाचा जिल्हा पर्यावरण प्रमुख होता. संदीप याच्या हत्येनंतर संघाच्य कार्यकर्त्यांनी आंदोलन करत तात्काळ आरोपींना पकडण्याची मागणी केली.
आरएसएसचा कार्यकर्ता असलेला संदीप शर्मा याचा रिअल इस्टेटचा देखील व्यवसाय होता. मंगळवारी रात्री जेवून झाल्यानंतर तो घराबाहेर बसलेला असताना बाईकवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला व ते तेथून पसार झाले. त्यानंतर संदीपला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान संदीपच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा संघाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
























































