पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा संसदेत तापला, विरोधकांचा हंगामा, सभात्याग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर इंधन तसेच एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ आज विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला.

लोकसभा व राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महागाईचा निषेध करणारे फलक घेत वेलमध्ये धाव घेतली. त्यामुळे सुरुवातीला दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी बारा व त्यानंतरही काही वेळासाठी तहकूब करावे लागले. केंद्र सरकारच्या महागाईधार्जिण्या भूमिकेचा विरोध करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहांतून सभात्यागही केला.

इंधन दरवाढ रोखण्यासाठी दर महिन्याला निवडणूका घ्या

या सरकारला पाच राज्यातील जनतेने बहुमताने किजयी केले. पण निकडणूका संपताच या सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ केली. जेक्हा निवडणुका असतात तेव्हा सरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत नाही. त्यामुळे दर महिन्याला निवडणुका घ्या, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला लगावला.

‘मिड डे मिल’ सुरू करा

कोरोनाचे कारण सांगत केंद्र सरकारने देशभरातील शाळांमधील मिड डे मिल स्कीम बंद केली आहे. त्यामुळे लहान मुलांना पौष्टिक अन्न मिळेनासे झाले आहे. रेशन दुकानातील मोफत अन्नधान्य हे मिड डे मिलला पर्याय होऊ शकत नाही, कांग्रेस सरकारने सुरू केलेली मिड डे मिल योजना केंद्र सरकारने तातडीने सुरू करावी, अशी आग्रही मागणी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत केली. यावेळी त्यांनी मिड डे मिलमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न मिळते हे महत्त्वाचे असून, रेशनच्या कोरडय़ा धान्याची त्याच्याशी तुलना करू नका, असेही बजावले.

काँग्रेस व भाजपचे आंदोलन

महागाईविरोधात संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळय़ाजवळ काँग्रेस खासदारांनी फलक झळकवत आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर पश्चिम बंगालमधील बीरभूमच्या घटनेच्या निषेधार्थ भाजप खासदारांनीही महात्मा गांधी पुतळय़ाजवळ घोषणाबाजी करत आंदोलन केले.