Rupali Bhosale Breakup – रुपाली भोसलेने ब्रेकअपबाबत मौन सोडले, अंकितपासून वेगळे होण्याचे कारण सांगितले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिनेसृष्टीत कलाकारांच्या प्रेमाच्या आणि ब्रेकअपच्या चर्चा सुरुच असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यात ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मराठी चित्रपटसृष्टीमध्येही सध्या एका ब्रेकअपची चर्चा सुरू आहे. हे ब्रेकअप आहे अभिनेत्री रुपाली भोसले आणि तिचा प्रियकर अंकित मगरे यांचं. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते, मात्र अचानक या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांमध्ये दुरावा का निर्माण झाला हे कळू शकलं नव्हतं. अभिनेत्री रुपाली भोसले तिच्यात आणि अंकितमध्ये नेमकं काय झालं याबाबत मौन सोडलं आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले आणि अंकित मगरे गेले अनेक वर्षे प्रेमबंधनात गुरफटून गेले होते. अंकित रुपाली पेक्षा वयाने लहान होता. ते लग्न करणार असल्याच्याही चर्चा ऐकू येत होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले आणि रुपालीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अंकितसोबतच्या नात्यात काही कारणांमुळे गेल्या ऑक्टोबरपासून कुरकुर सुरू झाली होती. यामुळे आपल्या नात्यात दुरावा निर्माण झाला असं रुपालीने सांगितलं आहे. या कुरकुरींनंतर आम्ही दोघांनी सामंजस्याने एकमेकांपासून वेगळं होण्याचं ठरवलं होतं असं रुपाली म्हणाली आहे. आजपर्यंत या दोघांपैकी कोणीही या ब्रेकअपबद्दल मोकळेपणाने बोललं नव्हतं. रुपालीने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत अंकितपासून आपण वेगळे झालो असल्याचं मान्य केलं आहे.

ब्रेकअपबाबत बोलताना रुपालीने म्हटलंय की, काम आणि कुटुंबाची सुरक्षा याला ती प्राधान्य देते. त्याआड जर काही गोष्टी येणार असतील तर ते नाते पुढे नेणं योग्य ठरणार नाही असं रुपालीने म्हटलंय. सोशल मीडियावर काही लाईक्स मिळवण्यासाठी नातं ताणण्यात काहीही अर्थ नसतो असंही तिचं म्हणणं आहे. अंकितसोबतचं नातं संपवताना दोघांनी संमतीने आणि सामंजस्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असं रुपालीने म्हटलंय. वेगळे झाल्यापासून रुपाली आणि अंकितमध्ये कोणत्याही मार्गाने संवाद झालेला नाहीये. ‘अंकितने जर मला अभिमान वाटावा अशा गोष्टी केल्या तर मी त्याला स्वत:हून फोन करेन’ असं रुपालीने म्हटलंय.

रुपालीला कोरोनाची लागण झाली होती. ती लागण कशी झाली हे तिलाही कळालं नव्हतं. कोरोनामुळे आपल्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाल्याचं रुपालीने मान्य केलं आहे. कोरोनानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या असून माझी उर्जाही काहीशी कमी झाली असल्याचं रुपालीचं म्हणणं आहे. सेटवर कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सगळी काळजी घेतली जात असली तर मनात सतत कोरोनाची भीती असतेच असं तिचं म्हणणं आहे.