
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांना चांगलेच भोवले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापाठोपाठ चाकणकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षपदावरूनही हटविण्यात आले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या आदेशानंतर चाकणकर यांनी महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
भोंदूबाबा खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली असून एसआयटी पुढील चौकशी करत आहे. मात्र याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकर यांचे काही पह्टो समोर आले होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यापाठोपाठ अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही चाकणकर यांनी राजीनामा दिला.

































































