रशियाने युक्रेनवर डागली 83 क्षेपणास्त्रे, इमारती, रस्ते, वाहने, उद्याने, पुलाला केले लक्ष्य, 12 नागरिक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युक्रेनने शनिवारी रशिया आणि क्रिमियाला जोडणारा पूल उद्ध्वस्त केल्यानंतर आक्रमक झालेल्या रशियाने आज युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. रशियाने युव्रेनची राजधानी किव्हसह 7 शहरांवर एकापाठोपाठ एक अशी 83 क्षेपणास्त्रे डागली. रशियाने या हल्ल्यात इमारती, रस्ते, वाहने, मुलांची उद्याने याच्यासह एक महत्त्वाचा पूलही उद्ध्वस्त केला. यात युव्रेनचे 12 नागरिक ठार झाले तर 57 जण जखमी झाले.

रशिया आणि युव्रेनमधील युद्धाला सात महिन्यांचा कालावधी लोटला असून या युद्धाचा पेच शांततापूर्ण मार्गाने सुटेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, युव्रेनने शनिवारी रशियाच्या कर्च पूल उडवून त्याला सुरुंग लावला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी संतापलेल्या रशियाने आज युव्रेनेची राजधानी किव्हसह महत्त्वाच्या 7 शहरांवर क्षेपणास्त्र्ाांचा मारा सुरू केला. एकापाठोपाठ अशी 83 क्षेपणास्त्रे डागून युक्रेनचे रस्ते, वाहने, उद्याने, इमारती आणि नाईपर नदीवर पादचाऱयांसाठी बांधण्यात आलेला पारकोवी पूल उद्ध्वस्त केला. त्यामुळे जगावर पुन्हा युद्धाचे ढग जमू लागले आहेत.

पुतीन यांची धमकी

युक्रेनने रशिया आणि क्रिमियाला जोडणाऱया पूल उद्ध्वस्त केल्यामुळे संतापलेल्या रशियाने 48 तासांत युव्रेनवर आज जोरदार हल्ला केला. या हल्ल्याचे रशियाने जोरदार समर्थन केले आहे. युव्रेनने केलेल्या हल्ल्यात अत्यंत घातक अशा अस्त्र्ाांचा वापर केला आहे. या पुढे युव्रेनने रशियाच्या कोणत्याही शहरावर तसेच अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला तर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम युव्रेनला भोगावे लागतील, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी दिली आहे.

हा रशियाने केलेला दहशतवादी हल्ला – युक्रेनचा संताप

युक्रेनच्या राजधानीसह 7 शहरांवर रशियाने केलेले क्षेपणास्त्रे हल्ला अत्यंत क्रूर असून रशियाने युव्रेनवर केलेला हा दहशतवादी हल्ला आहे. आम्ही कधीच रशियासमोर झुकणार नाही, आम्ही लढत राहू. रशियाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, जी-7 देशांनी तातडीने बैठक घेऊन रशियाच्या आक्रमकतेला लगाम घालण्यासाठी पावले उचलावी, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेस्की यांनी केले आहे.

फेब्रुवारीअखेरपासून सुरू झालेल्या युद्धाला आता 7 महिने होत आले असून आज युद्धाचा 229 वा दिवस आहे.
रशियाने युव्रेनच्या राजधानी किव्हसह टेरनोपील, लिव्ह, झाईटोमीर, खामेनिलिस्की, देन्पो, जापोरिजिया, मायकोलिव्ह आज क्षेपणास्त्र हल्ला केला.
युद्धाची तीव्रता पाहता युक्रेन सर्व शैक्षणिक संस्था 14 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.