भयंकर! तामिळनाडूत रशियन महिलेवर गँगरेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। चेन्नई

हिंदुस्थानात फिरण्यासाठी आलेल्या एका २१ वर्षीय रशियन महिलेवर तामिळनाडूत गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

हिंदुस्थानात पर्यटनासाठी आलेली ही महिला १२ जुलैला तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई येथे आली होती. यावेळी तिची काहीजणांशी ओळख झाली. त्यातील एकाने तिला पेयातून गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध झाल्यावर नराधमांनी तिच्यावर गँगरेप केला. दरम्यान यातील एका तरुणाने महिलेला रुग्णालयात दाखल केले होते. पोलीस चौकशीत त्याने शनिवारी महिलेबरोबर तिच्या संमंतीनेच शरीरसंबंध ठेवल्याचे सांगितले. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी परत तिच्या रुममध्ये गेलो असता ती बेशुद्ध असल्याचे आढळले. यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याचे त्याने सांगितले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.