सेक्रेड गेम-2 मुळे अक्षय, जॉन आणि प्रभासच्या डोक्याला ताप

38


सामना ऑनलाईन । मुंबई

जगभरात मनोरंजनाच्या क्षेत्रात डिजिटल प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे सिनेमा आणि छोट्या पडद्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सेक्रेड गेमचा पहिला सिजन खूप लोकप्रिय झाला होता. आता त्याचा दुसरा टिझर लाँच झाल्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला पहिल्यांदा वेब सिरीज आणि सिनेमामध्ये टक्कर होणार आहे. सेक्रेड गेम-2 मुळे अक्षय, जॉन आणि प्रभातच्या डोक्याला ताप झाला आहे.

सेक्रेड गेम-2 चा प्रिमिअर 15 ऑगस्टला होणार आहे. या आठवड्यात सुटी असल्याने या काळात मोठ्या फिल्मही रिलीज करण्यात येतात. यंदा 15 ऑगस्टला तीन मोठ्या फिल्म रिलीज होणार आहेत. त्यात अक्षय कुमारचा मिशन मंगल, प्रभास आणि श्रद्धा कपूरचा साहो,जॉन अब्राहमचा बाटला हाऊस यांचा समावेश आहे. त्याच दिवशी सेक्रेड गेम-2 चा प्रिमिअर असल्याने या तीन सिनेमांना तगडी टक्कर मिळणार आहे. त्यामुळे अक्षय, जॉन आणि प्रभासच्या सिनेमांना नुकसान होण्याची शक्यता असल्याचे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीक आणि पंकज त्रिपाठी या वेबसिरीजमध्ये आहेत. सेक्रेड गेम-1 लोकप्रिय झाल्याने याच्या पुढल्या सिरीजची उत्सुकता वाढली आहे.

सिनेमाच्या प्रेक्षकांना वेबसिरीज आपल्याकडे आकर्षित करू शकते. याचा पहिला भाग लोकप्रिय झाला होता. त्यामुळे दुसऱ्या भागाबाबत अनेकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, सेक्रेड गेममधील हिंसा, संवाद आणि काही दृश्यांमुळे तो कुटुंबासोबत बघता येत नाही. त्यामुळे कुटुंबासोबत सुटी साजरी करण्यासाठी काही प्रेक्षक सिनेमाला जाण्याची शक्यता आहे. आता या वेबसिरीजला हे तीन मोठे सिनेमे कशी टक्कर देणार याबाबतची चर्चा सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या