एक बार जो मैने कमिटमेंट कर दी…सलमानचा ‘राधे’ ईदलाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट ईदलाच प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सलमानने हा चित्रपट ईदला म्हणजेच 13 मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये ‘ईद का कमिटमेंट था, ईद पर ही आयेंगे, क्योकी एक बार जो मैने….’ असे त्याने म्हटले आहे.

कोरोनामुळे थिएटर मालकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे थिएटर मालकांना आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी थिएटर एग्झिबिटर्स असोसिएशनने ‘राधे’ हा चित्रपट ईदला थिएटरमध्येच प्रदर्शित करावा अशी विनंती सलमानला जानेवारीत केली होती. अखेर सलमानने आपला शब्द पूर्ण केला आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळाला आहे.