
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या ‘टायगर’, ‘टायगर जिंदा है ‘ या सिनेमाला बॉक्स ऑफीसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला. सिनेमाच्या यशानंतर चाहते सिनेमाच्या तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत होते. त्यांची ही प्रतिक्षा संपली असून बहुचर्चित ‘टायगर 3’ सिनेमाचा आज ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.. हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित होणार असून प्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे.
आज ‘टायगर 3’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या सिनेमात अॅक्शन, थरार आणि रोमान्स चाहत्यांना पाहायला मिळणार असल्याचे एकंदरीत ट्रेलरमधून दिसत आहे. चाहत्यांनी सिनेमाचा ट्रेलर आवडला असून सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात सलमान खानसोबत कतरिना कैफ महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर इम्रान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.




























































