बीड मध्ये संदीप क्षीरसागरांचा जोरदार  प्रचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी संदीप क्षीरसागर यांच्याकडे आहे. संदीप क्षीरसागर  प्रत्येक मतदाराच्या गाठी भेटी घेत हो मी उमेदवार समजून मत द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.

संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजयासाठी कामाला लागले आहेत. बीड शहरासह ग्रामीण भाग पिंजून काढत असूनत, प्रत्येक मतदाराच्या गाठीभेटी घेत पदरात मताचे माप टाका, आम्हाला आशिर्वाद द्या असे आवाहन करत आहेत. संदीप क्षीरसागराची तगडी यंत्रणा कामाला लागली आहे. कोणत्याही परिस्थिती मध्ये बीड विधानसभा मतदार संघातून बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळवून देण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.