
मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ची येत्या 20 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी माजी आयसीसी आणि बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांचा गट सज्ज झाला असून विविध पदांसाठी या गटाने आपले उमेदवार निश्चित केले आहेत. पवार गटातर्फे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील हे अध्यक्षपदासाठी उभे राहणार असून उपाध्यक्षपदासाठी नवीन शेट्टी हे रिंगणात आहेत. सचिव पदासाठी तरुण आणि उच्चशिक्षित अजिंक्य नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. सहसचिव पदासाठी गौरव पय्याडे आणि खजिनदार पदासाठी जगदीश आचरेकर हे निवडणूक लढवणार आहेत.
अध्यक्षपदासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार तर उपाध्यक्षपदासाठी अमोल काळे हे निवडणूक लढवणार असल्याचे कळते आहे. ते कोणत्या पॅनेलकडून निवडणूक लढवणार हेदेखील अद्याप निश्चित झालेले नाहीये. मुंबई क्रिकेट असोसिशनच्या निवडणुकीमध्ये पूर्वी बाळ महाडदळकर गटाचे वर्चस्व होते, मात्र या निवडणुकीपूर्वी महाडदळकर यांच्या कुटुंबीयांनी ‘महाडदळकर’ हे नाव वगळावे अशी विनंती केली होती. यामुळे पवार-महाडदळकर गटाचे नाव ‘पवार गट’ असे झाले आहे.
…तर ठाणे, पालघरमध्येही आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकादमी
मिलिंद रेगे, रत्नाकर शेट्टी हे पवार गटाचे मार्गदर्शक आहेत. पवार गटाने ही निवडणूक जिंकल्यास मैदान, कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये क्लब क्रिकेट संघ बळकट व्हावेत यासाठी त्यांना अधिकचे अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. बीकेसीप्रमाणे ठाणे आणि पालघरमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकादमी उभी राहावी यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे या गटाने सांगितले आहे.
शरद पवार गटाचे 16उमेदवार घोषित
शरद पवार गटाने एमसीए निवडणुकीसाठी 5 पदाधिकारी, 9 शिखर परिषदेचे सदस्य आणि गव्हर्निंग काऊन्सिलच्या
2 पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले आहेत. एमसीए शिखर काwन्सिलसाठी अभय हडप, कौशिक गोडबोले, संदीप विचारे, प्रशांत सावंत, दाऊद पटेल, विघ्नेश कदम, राजेश महंत, सुरेंद्र हरमलकर आणि सुरेंद्र शेवाळे हे निवडणूक लढवणार आहेत, तर मुंबई टी-20 गव्हर्निंग काQन्सिलच्या चेअरमनपदासाठी इक्बाल शेख तर सदस्यपदासाठी मौलिक मर्चंट मैदानात आहेत.




























































