
संभाव्य आपत्तीसाठी महापालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज झाला आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागाकडून आज आपत्ती काळात वापरण्यात येणाऱ्य़ा सर्वच साहित्याची तांत्रिक तपासणी करून दुरुस्ती हाती घेतली आहे.
मागील महापुराच्या काळात अग्निशमन विभागाच्या सर्व आपत्कालीन यंत्रणांच्या मदतीने नागरिकांना मदतीबरोबर अनेक ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनसुद्धा करण्यात आली. यामुळे अनेकांना वेळीच बाहेर काढता आले. या महापुरानंतर अनेक आवश्यक साहित्य खरेदी करून आयुक्त नितीन कापडणीस यांनी अग्निशमन विभागाचे आधुनिकीकरण केले आहे. सध्या पावसाळा सुरू होत असल्याने पुराची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आयुक्त कापडणीस यांनी अग्निशमन विभागाला सज्जतेबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी आज विभागाकडील सर्व आपत्कालीनवेळी वापरात येणाऱ्य़ा साहित्यांची तपासणी केली. तांत्रिक तपासण्या करीत अग्निशमन विभागाने सर्वच यंत्रसामग्री सज्ज ठेवली आहे.































































