शिवसेनेची संगमेश्वर तालुक्यात तीन ठिकाणी झाली महाआरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवरुख

देशभरातील शनिवारची संध्याकाळ शिवसैनिकांच्या महाआरत्यांनी दुमदुमुन गेली. शिवसेना पक्षप्रमुख उद्भव ठाकरे यांनी अयोध्येत दाखल होत शरयु तीरी महाआरती केली. याचवेळी देशभरातील राममंदिरातून महाआरतीचे प्रभु श्रीरामचंद्रांच्या जयघोषाचे सुर दुमदुमले. देवरुख वरची आळी येथील रघुपती मंदिरात कोसुंब तांबटवाडी, राममंदिर व साखरपा केतकर आळीतील राममंदिरात महाआरतीचे सुर घुमले. सुरुवातीला महिलांचे भजन झाले. आरतीतून श्रीराम जयराम जयजयरामचा गजर झाला. जय जय राम कृष्ण हरीचाही गजर व हरीनामाचा गजर करण्यात आला.

संगमेश्वर तालुका शिवसेनेतर्फे माजी आमदार सुभाष बने, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, जि.प.सदस्य रोहन बने यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन केले गेले. देवरुखमधील रघुपती मंदिरात महाआरतीसाठी तालुक्यातील पदाधिकारी, देवरुख नगरपंचायत नगरसेवक, कार्यकर्ते, महिला वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या राममंदिर संकल्पनेला जोरदार पाठींबा दर्शवला. संगमेश्वर तालुक्यातील शिवसैनिक एकदिलाने, एकजुटीने हा लढा यशस्वी करतील, असा विश्वास सुभाष बने यांनी व्यक्त केला.