रत्नागिरी-नागपूर महामार्गावर बोलेरो-ट्रॅक्टरची समोरासमोर धडक, पंढरपूरला देवदर्शनाला जाणाऱ्या 7 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मिरज तालुक्यातील वड्डी येथे भीषण अपघात झाला. बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 वर्षीय मुलासह तीन महिला, तीन पुरुषांचा समावेश आहे. बोलेरो गाडीतील सर्व मृत हे कोल्हापूर जिल्ह्यातील सरगडे माळवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळतीय. हे सर्व एकाच गाडीतून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील सरगडे माळवाडी येथील भाविक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी बोलेरो गाडीतून निघाले होते. ही गाडी मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वड्डी गावाच्या हद्दीत आली असताना राँग साईडने आलेल्या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला धडकली. यात गाडीचा चक्काचूर झाला असून गाडीतील 7 जणांचा मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणीला तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी मिरज पोलीस दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

Latur crime news दरोडेंच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना अटक, एक फरार

सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावर वड्डी गावाजवळ हा अपघात झाला. विटांनी भरलेला ट्रॅक्टर चुकीच्या दिशेने अचानक समोर आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. बोलेरो गाडी मधील सर्व प्रवासी कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने चालले होते. विशेष म्हणजे या मार्गावरुन वाहतूक सुरू झाल्याचा आजचा पहिलाच दिवस होता. महामार्गावर दिशादर्शक फलक लावले नसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.