
सामना ऑनलाईन । मुंबई
देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना हिंदुस्थानची टेनिसपटू सानिया मिर्झा हिला मात्र ट्विटरवरून ट्रोल करण्यात आले आहे. सानियाचा नवरा सोहेब मलिक हा पाकिस्तानी असल्याने काल म्हणजेच १४ ऑगस्टला काही नेटकऱ्यांनी तिला पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावरून सानिया संतापली असून तिने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
Jee nahi.. mera aur mere country ka Independence Day kal hai, aur mere husband aur unnki country ka aaj!! Hope your confusion is cleared !!Waise aapka kab hai?? Since you seem very confused .. https://t.co/JAmyorH0dV
— Sania Mirza (@MirzaSania) August 14, 2018
काल एका नेटकऱ्याने सानियाला ट्विटरवरून आज तुझ्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे ना? असा प्रश्न केला. त्याच्या या प्रश्नावर सानिया संतापली व तिने त्या ट्रोलरला चांगलेच सुनावले. ‘अजिबात नाही, माझा आणि माझ्या देशाचा स्वातंत्र्य दिन उद्या म्हणजेच १५ ऑगस्टला आहे. माझ्या नवऱ्याचा आणि त्याच्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आज आहे. मला आशा आहे की तुमचा संभ्रम दूर झाला आहे. पण तुमचा स्वातंत्र्य दिन नक्की कधी आहे? तुम्ही मला फारच कन्फ्युज्ड वाटता’, असे सानियाने त्या ट्रोलरला सुनावले.
SUMMARY – SANIA MIRZA GIVES BEFETTING REPLY TO TROLLERS




























































