
साकिब रिझवी यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण डॉ. अख्तर हसन रिझवी आणि रुबिना रिझवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पी. व्ही. शेट्टी, सुलक्षण नाईक, अजिंक्य नाईक, अरमान मलिक आणि विशेष अतिथी म्हणून संदीप दहाड उपस्थित होते.
साकिब रिझवी स्मृती चषकासाठी 52 ज्युनियर महाविद्यालयीन संघ भिडत आहे. रिझवी एज्युकेशन सोसायटीने या स्पर्धेला पुरस्कृत केले असून ही स्पर्धा महिनाभर रंगणार आहे. रिझवी एज्युकेशन सोसायटी आणि रिझवी कॉलेजने नेहमीच खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला असून साकिब रिझवी यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी स्पर्धेचे दिमाखदार आयोजन केले जाते, अशी माहिती रुबिना रिझवी यांनी दिली. या स्पर्धेला डॉ. अख्तर हसन रिझवी (अध्यक्ष, रिझवी एज्युकेशन सोसायटी) आणि अॅड. रुबिना रिझवी (संचालक, रिझवी एज्युकेशन सोसायटी) यांनी पूर्ण सहकार्य केले आहे.




























































