
चीनकडून सुरू असलेल्या कुरापती काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाही. चीनने आता भूतानच्या सीमेजवळ नवीन गावाच्या बांधकामास सुरुवात केली आहे. याशीच संबंधित सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) वर आधारित सॅटेलाइटने टिपलेले काही फोटो समोर आले आहे. ज्यात चीनने भूतानच्या सीमेजवळ सुरू केलेलं बांधकाम स्पष्ट दिसत आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाच सॅटेलाइट फोटो समोर आले होते, ज्यात चीन भूतानच्या सीमेजवळ एका गावाचे निर्माण करताना दिसत आहे. या फोटोचे रेसोलुशन कमी असल्याने हे निर्माण कार्य भूतान सीमेजवळ नेमके कुठे सुरू आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. सॅटेलाइट फोटोचे तज्ञ अमेरिकेचे क्रिस बिगर्स यांच्या मते, या नवीन गावाच्या एका भागात दोन मजली बांधकाम सुरु आहे.
18 नोव्हेंबर रोजी टिपण्यात आलेल्या या फोटोंमधील एक फोटोत एका भागात 39 दोन मजली बांधकाम झाल्याचे दिसत आहे. ज्यातील 27 घराचे पूर्ण बांधकाम झाल्याचे दिसून येत आहे. तर याच्या पूर्वेकडील भागात 15 घरांचे पूर्ण बांधकाम झाल्याचे दिसत आहे. तर याच्या मध्य भागातील 19 मधील 9 घरांचे अजूनही बांधकाम सुरु असल्याचे दिसत आहे. सॅटेलाइटने टिपलेल्या या फोटोंमध्ये भूतानच्या सीमेजवळ एकूण 80 घरांचे बांधकाम सुरु असल्याचे दिसत आहे. ज्यातील 58 घरांचे बांधकाम पूर्ण झाल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे.



























































