जिपच्या बोनटवरून पडून टायरखाली आल्याने शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हदगांव

हदगांव तालुक्यातील गोर्लेगाव येथील आठवीत शिकणारा समीर अब्दूल पठाण हा चौदा वर्षाचा शाळकरी मुलगा आठवडी बाजारातून गावाकडे परतण्यासाठी जिपच्या बोनटवर बसून प्रवास करीत होता. धावत्या जिपवरून पुढे पडल्यामुळे आंगावरून चाक केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना हदगांव गोर्लेगाव रोडवर काल शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

शुक्रवारी हदगांवचा आठवडी बाजार असतो. सदर मयत विद्यार्थी गोर्लेगावच्या जिल्हा परिषद शाळेत आठव्या वर्गात शिकत होता. तो आठवडी बाजार करून गावाकडे परतण्यासाठी जिपच्या बोनटवर बसला, ही गाडी गोर्लेगावपासून एक किलोमिटर अंतरावर असतांनाच एका खड्ड्यात आदळल्याने समीर पठाण धावत्या जिप समोर पडला. त्याच्या आंगावरून जिपचे चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन करून आज त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.