कात्रड गावात जमीन दुभंगून पंधरा फूट खोल रूंदीचे भले मोठे भुयार

145

सामना प्रतिनिधी । राहुरी

राहुरी तालुक्यातील कात्रड गावात जमीन दुभंगून पंधरा फूट खोल व चार फूट रूंदीचे भलेमोठे भुयार पडल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली आहे. गावात भुयार पडल्याची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

कात्रड गावातील अरूण पांडुरंग लोखंडे यांच्या घरासमोरील प्रांगणात आज मंगळवारी सकाळी हे भुयार पडले आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नाही. हे भुयार आडवे असून पुढे त्याच्या खोलीचा ठाव लागत नसल्याने या ठिकाणाचे गुढ कायम आहे.

काञड या गावात पुरातन जुनी गढी असल्याची माहिती गावकऱ्यांकडून मिळाली. या भुयारा पासून गढीचे अंतर पन्नास फूटावर असल्याने भुयाराचा संबंध या गढीशी असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. काञड गावात भुयार पडल्याची माहिती मिळताच कामगार तलाठी पाडळकर, अमोल दांगट, ग्रामसेवक अरूण सोनवणे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.

पौराणिक वारसा असलेले गाव म्हणून राहुरी तालुक्यातील काञड गावाची ओळख आहे. शंभर वर्षापूर्वी या गावात गढी असल्याचा इतिहास आहे.

आपली प्रतिक्रिया द्या