
फिट राहणे ही काळाजी गरज बनत चालली आहे. त्यामुळे आजकाल सर्वच फिटनेसकडे लक्ष देत आहेत. त्यात तुम्ही जर चित्रपटसृष्टीमध्ये काम करत असाल तर फिटनेस आवश्यकच आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी देखील फिटनेसवर लक्ष देत असून अभिनेत्यांसह अभिनेत्रीही यात आघाडीवर आहे. शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, करिना कपूर-खान या बॉलिवूडमधील फिटनेस आयकॉन आहेत. मात्र या सर्वांना एक टॉलिवूड अभिनेत्री तेवढ्याच तोडीची टक्कर देताना दिसत आहे.
फिटनेसच्या बाबतीत मलायका अरोराचे नाव आघाडीवर आहे. वयाच्या 48 शी मध्येही ती एकदम फिट आहे. सोशल मीडियावर कसरतींचे ती अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करत असते. मलायकाच्या तोडीसतोड फिटनेस शिल्पा शेट्टी हिचाही आहे. फिटनेस आणि योगाचे व्हिडीओ शिल्पाही शेअर करत असते.
View this post on Instagram
दरम्यान, काजोल, करिना कपू-खान, ऐश्वर्या रॉय या देखील फिट अभिनेत्री आहेत. मात्र मधल्या काळात त्यांचे वजन खूपच वाढल्याचे दिसते होते, परंतु योग्य आहार आणि व्यायमाच्या जोरावर त्यांनी आपला बांधा अधिकच सुरेख केला आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्री फिट आहेतच परंतु टॉलिवूडमधील एक अभिनेत्री आणखी जास्त वरचढ ठरताना दिसतेय.
View this post on Instagram
दक्षिणेकडे तमन्ना भाटिया, काजल अग्रवाल, समंथा यासारख्या फिट अभिनेत्री आहेत. परंतु एका नव्या नावाने या सर्वांनाच मागे टाकले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे सिरत कपूर. ‘जिद’ चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलो होते. परंतु त्यानंतर तिने दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. ‘टायगर’, ‘ओक्का क्षणाम’, ‘राजू गरी गढी’ यासारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.
View this post on Instagram
सिरत कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. आपल्या अधिकृत अकाउंटवरून ती अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे अनेक व्हिडीओ फिटनेसच्या निगडीत असतात. जिममधील फोटो देखील ती पोस्ट करत असते. साऊथची फिटनेस क्वीन अशी तिची ओळख बनली आहे.
‘मिर्झापूर’ फेम अभिनेता विक्रांत मैसी अडकला विवाहबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल
काय आहे फिटनेसचे रहस्य?
सिरत एवढी फिट कशी असा प्रश्न वाचकांना पडला असेल. आपल्या फिटनेसचे रहस्य तिने स्वत: सांगितले आहे. फक्त वर्कआऊटच नाही तर योग्य डाएट सिरत फॉलो करते. योग्य प्रमाणात पाणी आणि फळांचेही ती सेवन करते. तसेच आठ तासांची झोपही घेते. योग्य दिनचर्या आणि आहार यामुळे ती एवढी फिट आणि सुंदर दिसते, असे सिरत सांगते.
Health Tips – सकाळी रिकाम्या पोटी ‘हे’ 7 पदार्थ खाऊ नका, आजारांना द्याल आमंत्रण






























































