सेनेगलची पुनरावृत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मॉस्को

आफ्रिकन खंडातील सेनेगलने मंगळवारी फिफा वर्ल्ड कपमध्ये आपला ठसा उमटवला. दुसऱ्यादाच वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या सेनेगलने सलामीच्याच लढतीत बलाढ्य पोलंडला २-१ अशा फरकाने हरवत ‘एच’ गटात मोठा उलटफेर केला. याआधी सेनेगलने २००२ सालच्या वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सला हरवत चमत्कार केला होता.

पोलंडच्या खेळाडूकडून ३७व्या मिनिटाला चूक घडली. त्यामुळे सेनेगलला १-० अशी आघाडी घेता आली. थियाओ सिओनेकच्या लागून फुटबॉल गोलजाळ्यात अडकला आणि सेनेगलला आघाडी घेता आली. त्यानंतर उत्तरार्धात ६०व्या मिनिटाला एमबाए निआंगने पोलंडच्या सुमार बचावाचा फायदा घेत सेनेगलसाठी दुसरा गोल केला.

आजच्या लढती
पोर्तुगाल वि. मोरोक्को
(सायं. ५.३० वा.)
उरुग्वे वि. सौदी अरेबिया
(रात्री ८.३० वा.)
स्पेन वि. इराण
(रात्री ११.३० वा.)